Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

विचार-विनिमय करून घेणार जनता कर्फ्यूचा निर्णय.
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे शासनाने बरेचसे निर्बंध हटवल्यामुळे शहरात सर्वत्र गर्दी झाली असून परिणामत: सांगोला शहरात कोरोना रुग्णांची वाढ अत्यंत झपाट्याने होऊ लागली आहे त्यामुळे शहरातील बहुतांश नागरिकांकडून जनता कर्फ्यु लावण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली जात आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणन्याकरिता व कोरोना विषाणूची साखळी तोडणे करिता सध्या जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नसल्याने याबाबत विचारविनिमय करण्याकरिता आज रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर सभागृहामधे दुपारी १२ वाजता आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीसाठी माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख, मा. दिपक आबा साळुंखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख,प्रा.झपके सर,बाबुराव गायकवाड,नगराध्यक्षा सौ राणीताई माने यांच्यासह सर्व नगरसेवक व सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी,व्यापारी संघटनाचे प्रतिनिधी,पत्रकार बांधव,प्रतिष्ठित नागरीक यांना आमंत्रित केले आहे.
सर्व नेतेमंडळी व व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करून जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.सदर बैठकीमध्ये सोशल डिस्टंसिंगचा काटेकोर पालन करणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापु पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *