Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नागरिकांना आवाहन

सोलापूर, दि.14: राज्यात येत्या शनिवारपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहवू नये, मोबाईलवर संभाषण करु नये, वीजेच्या वस्तू अथवा तारा यांच्या पासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागाने येत्या शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यंत्रणेला दिलेल्या सूचना

1. जिल्हास्तरीय अधिकारी यांनी मुख्यालयात राहून योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

2. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभागाने झाडे पडणे, इमारती पडणे इत्यादी परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावे.

3. जुन्या इमारती, पुल इत्यादी ठिकाणी आपत्कालिन परस्थिती उदभवूनये म्हणुन आवश्यक ती दक्षता घ्यावी.

4. गरज भासल्यास वाहतुक सुरक्षित ठिकाणी वळवावी अथवा तात्पुरती थांबवावी.

5. पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बोटी, पोहणारे लोक, आरोग्य व्यवस्था, जेसिबी मशिन इत्यादीबाबी सज्ज ठेवाव्यात.

6. एसटी ,रेल्वे आणि खाजगी परिवहन सेवा यांच्यात समन्वय ठेवावा.

7. वादळामुळे झाडे पडल्यास ती तत्काळ दूर करुन वाहतुक सुरळीत ठेवावी.

8. नागरिकांना वारंवार संभाव्य बाधित क्षेत्राबाबत सूचना द्याव्यात.

नागरिकांना आवाहन

1. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.

2. घराबाहेर असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.

3. पाऊस पडताना अथवा वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहु नका.

4. मोबाईलवर संभाषण करु नका. वीजेच्या तारा, वस्तुपासून दूर रहा.

5. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका.

6. पुराच्या पाण्याजवळ सेल्फी काढू नका.

7. आपतकालीन मदतीसाठी 0217-2731012 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

8. दामिनी लाईटनिंग अलर्ट हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *