Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापुरात वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांना पक्षी निरीक्षण करत असताना शेंडीवाला कोतवाल (केसराज कोतवाल) पहिल्यांदा नजरेस पडला. इंग्रजी मध्ये याला Haircrested drongo किंवा Spangled drongo म्हणतात.
सोलापुरात Black drongo (कोतवाल), Ashy drongo (राखी कोतवाल) आणि White bellied drongo (पांढऱ्या पोटाचा कोतवाल) असे तीन प्रकारचे कोतवाल आढळतात. यावर्षी शिवानंद हिरेमठ, रत्नाकर हिरेमठ, ऋतुराज कुंभार आणि महादेव डोंगरे निरीक्षण करत असताना शिवानंद हिरेमठ यांच्या नजरेस Spangled drongo दिसला आणि सोबत असलेल्या सदस्यांना याबद्दल माहिती देऊन निरीक्षण करून आनंद घेतला.
Black drongo (कोतवाल) यांचा आढळ जास्त आहे आणि Ashy drongo व White bellied drongo हे कमी प्रमाणात दिसतात.
शेंडीवाला कोतवाल याचे अधिवास दाट जंगलात आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मध्यम आकाराच्या मैनेएवढा,
डोक्यावर केसासारखी दिसणारी लांब पिसे असतात ही पिसे सहजपणे दिसून येत नाहीत. चोच लांब, जाड आणि थोडीशी बाक असते. शेपटीच्या टोकाची पिसे वरच्या बाजूला अधिक वळलेली, रंगाने काळा असून शरीरावर प्रकाश पडल्यानंतर चमकदार उठून दिसतो.
अतिशय गमतीचा भाग म्हणजे हा अनेक प्रकारचा आवाज काढतो.
वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असो. सदस्यांनी आतापर्यंत विविध प्रकारचे नवनवीन पक्ष्यांच्या नोंदी केलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *