सोलापूर ग्रामीण | आज कोरोनामुक्त 101 तर पॉझिटिव्ह 151 ; 8 जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सोमवारी ग्रामीण भागातील 151 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 78 पुरुष तर 73 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 101 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4094 इतकी झाली आहे. यामध्ये 2481 पुरुष तर 1613 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 120 जणांचा मृत्यू झाला आहे यात 80 पुरुष तर 40 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1625 आहे .यामध्ये 1002 पुरुष 623 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2349 यामध्ये 1399 पुरुष तर 950 महिलांचा समावेश होतो.