सोलापूर ग्रामीण | पॉझिटिव्ह 53; तर एक जणांचा मृत्यू

MH13 News Network

आज मंगळवारी दि. 5 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 41 पुरुष तर 12 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 63 आहे. यामध्ये पुरुष 42 तर 21 महिलांचा समावेश होतो . आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1405 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1352 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 38 हजार 327 इतकी झाली आहे. यामध्ये 23757 पुरुष तर 14570 महिला आहेत.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1133 जणांचा मृत्यू झाला आहे यात 812 पुरुष तर 321 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 499 आहे .यामध्ये 371 पुरुष तर 128 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 36 हजार 695 यामध्ये 22574 पुरुष तर 14121 महिलांचा समावेश होतो.

या भागातील एक जणांचा मृत्यू…

सोलापूर जिल्हा परिसरातील करकंब ता. पंढरपूर येथील 75 वर्षांचे पुरुष, यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 10 तर ग्रामीण 6

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 0

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 10

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 0

मंगळवेढा – नागरी 4 ग्रामीण 2

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 5 ग्रामीण 7

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 1

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

आजच्या नोंदी नुसार नागरी – 22 तर ग्रामीण भागात 31 असे एकूण 53 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.