सोलापूर ग्रामीण पोलीस CCTNS मध्ये राज्यात उत्कृष्ट व कोल्हापूर परिक्षेत्रात नंबर 1…

भारत सरकारच्या ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अंड सिस्टीम (C.C.T.N.S.) प्रकल्प राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने सन 2015 सालापासून सीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत सर्व पोलीस ठाणेस ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आलेली असून पोलीस दलामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपास व नियंत्रण ही महत्त्वाची कामे करावी लागतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे. यापूर्वी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते परंतु आजच्या डिजिटल युगात गुन्ह्यांचे प्रमाणात मोठी वाढ झालेली असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी आधुनिक तंत्र पद्धतीचा वापर करून क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्मार्ट पोलिस यंत्रणा सज्ज झालेली आहे.

ऑनलाईन कार्यप्रणालीला गती येण्याकरिता अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे. यांचे कार्यालयाकडून प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात येतो. सीसीटीएनएस प्रणालीअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटक जिल्ह्यास गौरवण्यात येते. त्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे माहे ऑगस्ट 2020 मध्ये सीसीटीएनएस कार्यप्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्रात चतुर्थ क्रमांक व कोल्हापूर परिक्षेत्र मध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून महाराष्ट्र राज्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नावलौकिक झाले आहे.

सीसीटीएनएस चे कामकाज पाहणारे सपोनि सचिन हुंदळेकर पोलीस हवालदार इक्बाल शेख, सागर कासार, फिरोज तांबोळी, राजेंद्र घोडके यांना मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक 10/11/2020 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले आहे. सदर वेळी मा. श्री. अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अरुण सावंत उपअधीक्षक मुख्यालय, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

तसेच महाराष्ट्र राज्यासह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाज पाहणारे अंमलदार यांचेवर कौतुकासह शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.