Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

आज मंगळवारी दि.17 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 76 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 53 पुरुष तर 23 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 197 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 518 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 442 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 33 हजार 358 इतकी झाली आहे. यामध्ये 20,611 पुरुष तर 12,747 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 994 जणांचा मृत्यू झाला आहे यात 713 पुरुष तर 281 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 678 आहे .यामध्ये 1 हजार 279 पुरुष तर 399 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 30 हजार 686 यामध्ये 18,619 पुरुष तर 12,067 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 11 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 4

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 8

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 8

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 1

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 3

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 11 ग्रामीण 5

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 3

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 4

आजच्या नोंदी नुसार नागरी – 26 तर ग्रामीण भागात 50 असे एकूण 76 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *