Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी दि.5 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 361 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 208 पुरुष तर 153 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 141 आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 3644 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3283 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 13 हजार 210 इतकी झाली आहे. यामध्ये 7051 पुरुष तर 5139 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 382 जणांचा मृत्यू झाला आहे यात 261 पुरुष तर 121 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 696 आहे .यामध्ये 2 हजार 369 पुरुष तर 1327 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 132 यामध्ये 5421 पुरुष तर 3711 महिलांचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *