सोलापूर:- दिनांक 19 नोव्हेम्बर 2020
भारताचे माजी पंतप्रधान प्रियदर्शिनी स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अंबादास बाबा करगुळे, प्रभाग 15 चे नगरसेविका सौ. वैष्णवीताई करगुळे यांच्या वतीने हार्ट लैंड कंपाउंड रंग भवन चर्च मागे येथे सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली धान्य वाटप करण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, जिल्हा कार्याध्यक्ष पंडित सातपुते, सुनील उमाप, अरुणा भालेराव, मीणा गायकवाड़, करूणा नवगिरे, सुभाष वाघमारे, रेशमा ठोम्बरे, सुरेखा येनमूल, शारदा नाइक, रेखा नाइक, प्रमिला उमाप यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरगरीबांना धान्य वाटप करण्यात आले.