MH13 News Network
सोलापूर शहर हद्दीत आज मंगळवारी दि.22 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 53 रुग्ण आढळले असून यामध्ये 29 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 29 इतकी आहे.
आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 435 निगेटीव्ह आहेत.

आज पुन्हा 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8006 असून एकूण मृतांची संख्या 463 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 954 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6589 इतकी आहे.