सोलापूर शहरात आज शनिवारी दि.24 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 28 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 56 इतकी आहे. यामध्ये 33 पुरुष तर 23 महिलांचा समावेश होतो.
आज शनिवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार फक्त 331 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 311 निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाने एकजण मृत्यू पावला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
मयत झालेली व्यक्ती सुरवसे नगर कुमठा नाका परिसरातील 84 वर्षाचे पुरुष असून 19 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी मार्कंडेय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले होते उपचारादरम्यान 23 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता.
आजचे आढळलेले पॉझिटिव्ह
मराठा वस्ती, टिळक चौक, उत्तर कसबा, देगाव नाका, नई जिंदगी, टिळक चौक उत्तर कसबा, देगाव, कमलसिद्ध अपार्टमेंट, आर्यनंदी नगर वसंत विहार, बंजारा सोसायटी, विजापूर रोड ,पाटील नगर सैफुल, जुना विडी घरकुल, साहिल नगर मजरेवाडी, पद्माजंली अपार्टमेंट मोदीखाना, टिळकनगर मजरेवाडी, गुरुनानक नगर ,सलगर वस्ती, न्यू पाच्छा पेठ ,गोकुळ नगर जुळे सोलापुर, मंत्री चंडक नगर रूपाभवानी मंदिर जवळ या भागातील व्यक्तींचे अहवाल बाधित आढळून आले.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9394 असून एकूण मृतांची संख्या 525 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 535 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8334 इतकी आहे.
महापालिका आयुक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार किराणा दुकानदार,हातगाडी चालक, पथविक्रेते यांनी स्वतःची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दुकानांमध्ये दर्शनी भागात या बाबतचे प्रमाणपत्र अडकवणे गरजेचे आहे.