MH13 NEWS NETWORK
सोलापूर शहरात बुधवारी दि. 6 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले असून यामध्ये 13 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे.
आज बुधवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 508 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 490 निगेटीव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 68 लोक बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. तर आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह व्यक्ती…
मंत्री चंडक नगर भवानी पेठ, वसंत विहार, सम्राट चौक, साखर पेठ कन्ना चौक, लोणार गल्ली उत्तर कसबा, बेघर हौसिंग सोसायटी विजापूर रोड, निखिल पार्क विजापूर रोड, जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ, वसुंधरा कॉलेजजवळ जुळे सोलापूर, वेदांत अपार्टमेंट किनारा हॉटेलजवळ, अभिमानश्री अपार्टमेंट अरविंदधाम, अनुषा अपार्टमेंट नवल पेट्रोलपंपाजवळ, बुधवार पेठ, झोपडपट्टी नं. 1 गांधीनगर अक्कलकोट रोड, हेरिटेज अपार्टमेंट मॉडन हायस्कूलजवळ, समर्थ नगर, विशाल नगर वच्चे हॉस्पिटलजवळ या परिसरातील तेरा पुरुष आणि पाच महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.
शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,166 असून एकूण मृतांची संख्या 603 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 326 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10237 इतकी आहे.
हे आहे महत्वाचे
सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.
Leave a Reply