सोलापूर शहरात बुधवारी दि. 13 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळले असून यामध्ये 6 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे.
आज बुधवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 442 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 431 निगेटीव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 61 आहे. आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह व्यक्ती…
यशोधन अपार्टमेंट, रेसिडेंस क्वार्टर सिव्हिल हॉस्पिटल, बेगम पेठ, सिद्धेश्वर सोसायटी भवानी पेठ, सम्राट चौक, सागर चौक विडी घरकुल, शिवगंगा नगर कुमठा नाका, हनुमान नगर भवानी पेठ, इंद्रधनु रेल्वे लाईन्स, एकता नगर डब्ल्यू. आय. टी. जवळ या परिसरातील अकरा पुरुष आणि चौदा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.
या परिसरातील एकाचा मृत्यू…
सम्राट चौक परिसरातील महेश नगर भागातील नव्वद वर्षांच्या एका व्यक्तीस आठ जानेवारी रोजी बलदवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना 11 जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्याच रात्री पुन्हा त्रास झाल्याने 12 जानेवारी रोजी रात्री अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांना 12 जानेवारी रोजी रात्री बारा वाजून 31मिनिटांनी मयत घोषित करण्यात आले.
शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,350 असून एकूण मृतांची संख्या 614 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 285 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10451 इतकी आहे.
हे आहे महत्वाचे
सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.