Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात मंगळवारी किरण किरण दि. 12 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 25 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे.

आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 604 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 579 निगेटीव्ह तर 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या बारा आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…

कस्तुरबा मार्केट जवळ बुधवार पेठ, सहस्त्रार्जुन नगर जुळे सोलापूर, सिंधू विहार जुळे सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर सैफुल, वीर्शैव नगर, जानकी नगर जुळे सोलापूर, इंदिरानगर विजापूर रोड, श्रीशैल नगर भवानी पेठ, गांधी नगर, एम.आय.डी.सी रोड, धुम्मा वस्ती आशिर्वाद नगर, न्यू बुधवार पेठ या परिसरातील अकरा पुरुष आणि चौदा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,339 असून एकूण मृतांची संख्या 613 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 336 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10390 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *