सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज गुरूवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 12 पर्यंत 541 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 489 अहवाल निगेटिव्ह आले असून 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 29 पुरुष तर 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 106 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहर परिसरात आज पर्यंत एकूण 369 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 244 पुरुष तर 125 महिलांचा समावेश होतो.
आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5291 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 369 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1381 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3541इतकी लक्षणीय आहे.