Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

वळसंग पोलिस ठाण्याची दमदार कारवाई ;एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यावर छापा ; सुमारे 3 लाख 53 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त

याबाबत वळसंग पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील टवाळखोर रेकॉर्डवरचे आरोपी मटका, दारू,जुगार आदी अवैध धंद्याविषयी जर कोणाला माहित असल्यास तर वळसंग पोलिस ठाणे येथे ही माहिती द्यावी व आपले नाव हे गुपित ठेवून कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने काल वळसंग पोलिसांना एका गुप्त बातमीदारामार्फत कुंभारी गावातील मल्लू जमादार यांच्या शेतात सात ते आठ इसम हे एकत्रित बसून मन्ना नावाचा जुगार खेळत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता काही जण हे जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांनी कुंभारी येथील मल्लू जमादार यांच्या शेतात छापा टाकला असता दोन आरोपी हे पळून गेले आणि तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले.
त्यांचे नाव पुढील प्रमाणे मुरलीधर रामदास गलमय (वय 40 राहणार (विडी घरकुल कुंभारी) श्रीनिवास गुंडली (वय 40 राहणार लक्ष्मीनारायण टॉकीज एमआयडीसी )सोलापूर आणि रोहित चंद्रकांत मेघजी वय 28 राहणार घोंगडे वस्ती सोलापूर यांच्याकडून आठ हजार 610 रुपये, रोख रक्कम तीन मोबाईल, तीन हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत एक लाख 46 हजार 610 इतकी होती.

सदर कामगिरी ही वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मानगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हंचाटे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत बिराजदार, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल अश्फाक मियावाले ,पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण काळजे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार यांनी पार पाडली.

तर दुसरी कारवाई मौजे कुंभारी शिवारातील रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील मैदानात काही इसम हे गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची ही बातमी पोलिसांना मिळाली .त्याप्रमाणे वरील ठिकाणी पोलिस गेले असता आठ ते दहा जण हे जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांचे नाव पुढील प्रमाणे जमीर शेख (वय 44 राहणार 68 रविवार पेठ सोलापूर ),अलीम जरतारघर( वय 40 राहणार 652 साखर पेठ सोलापूर ),मोहम्मद बिल्लेवाले वय 19 (राहणार 70 फूट रोड सोलापूर) आसिफ जकलेर वय 31 राहणार 290 शनिवार पेठ सोलापूर ,महंमद बागवान वय 40 राहणार साखर पेठ सोलापूर, मोहम्मद शेख वय 23 राहणार रविवार पेठ सोलापूर ,आसलम मुल्ला वय 43 राहणार रविवार पेठ सोलापूर सैपन इरकल वय 35 राहणार तेलंगी पच्चा पेठ सोलापूर ,परवेज पेरमपल्ली वय 29 राहणार पाथरूट चौक सोलापूर, सादिक नाईकवाडी वय 22 राहणार साखर पेठ सोलापूर ,यांच्याकडून 12 हजार 620 रोख रक्कम 10 मोबाईल दोन ॲपे रिक्षा असे मिळून एकूण किंमत दोन लाख सात हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानगावे यांच्या आदेशान्वये आणि वळसंग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हंचाटे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस नाईक माने, पोलीस कॉन्स्टेबल गुंड ,आदींनी ही कारवाई केल्याची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हंचाटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *