९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जयंत नारळीकर

नाशिक दि.२४ -नाशिक येथे होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रविवारी ( २४ जानेवारी) रोजी घोषणा केली. साहित्य महामंडळाची मागदर्शन निवड समितीची शनिवार पासून नाशिक शहरात सुरु होती यावेळी कार्यक्रमाची रुपरेशा ठरविण्यात आली २४ जानेवारी रोजी गंगापूर रोड वरील एका मंगल कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्यात आली यावेळी प्राचार्य कौतिकराव ठाले- पाटील, औरंगाबाद, डॉ. दादा गोरे औरंगाबाद, डॉ. रामचंद्र काळूंखे, औरंगाबाद, मिलिंद जोशी, पुणे, प्रकाश पायगुडे, पुणे, सुनिता राजे पवार, पुणे, प्राचार्य उषा तांबे, मुंबई, प्रतिभा सराफ, मुंबई, श्रीमती उज्वला मेहंदळे, मुंबई, विलास मानेकर, नागपूर, प्रदीप दाते, वर्धा, गजानन नारे, प्रसाद देशपांडे, बडोदा, सप्रे, भोपाळ, विद्या देवधर, हैद्राबाद, कपूर वासनिक, विलासपुर, भालचंद्र शिंदे, गुलबरगा व उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनमाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे सदस्य उपस्थित होते. सकाळी ११ वाजता बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थितांचा सत्कार लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्य चर्चेला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारत सासणे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ज्येष्ठ साहित्यिक जयंत नारळीकर यांचे नव चर्चेला आल्यानंतर त्यांचे नाव मागे पडले. यातील दहा लोकांनी जयंत नारळीकरांच्या नावाचा आग्रह धरला तर काही लोकांनी भरत सासणे हे गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असल्याने त्यांच्या नावाचा आग्रह धरला. शेवटी लेखकांची ज्येष्ठता व साहित्यमुल्य लक्षात घेता जयंत नारलीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांचे नाव गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होते. मागील वर्षी उस्मानाबाद येथे झालेल्या संमेलनावेळीही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यावेळी फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव पुढे आल्याने त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. यंदाच्या संमेलनाची तयारी सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सासणे यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्याबरोबर रवींद्र शोभणे यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. बैठकीची वेळ जवळ येऊ लागली तशी संमेलनाध्यक्ष इच्छुकांच्या यादीत वाढ होऊ लागली आहे. त्यात तारा भवाळकर, ना. धों. महानोर, अनिल अवचट, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे अशा विविध नावांची चर्चा सुरू झाली. यापैकी ना. धों. महानोर यांनी स्वत: नकार दिल्याने त्यांचे नाव आपोआप हटले आहे. आयोजन समितीने एक नाव देण्याची पद्धत आहे, त्यानुसार नाशिककच्या लोकहितवादी मंडळाने नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या मनोहर शहाणे यांचे नाव दिले आहे. या नावाला नाशिकच्या साहित्यिकांनीदेखील प्रतिसाद दिला. मनोहर शहाणेच संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेऊन शहरातील साहित्य संस्थांनी निवेदन दिले. त्याचप्रमाणे एक नाव माजी संमेलनाध्यक्षांनी सुचविण्याचा रिवाज आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली होती.