Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात रविवारी दि. 24 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 2 स्त्रियांचा समावेश आहे.

आज रविवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1251 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1240 निगेटीव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 13 आहे. आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
फुरडे रेसिडेन्सी विजापूर रोड, भवानी पेठ, मोठी ईरन्ना वस्ती, दाजी पेठ, मंत्री चंडक भवानी पेठ, सम्राट अशोक सोसायटी कुमठा नाका, आदित्य नगर आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, राजीव नगर प्रताप तांडाजवळ, भगवती सोसायटी सम्राट चौक, सवेरा नगर विजापूर रोड या परिसरातील 9 पुरुष आणि 2 महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

या भागातील एकाचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील सम्राट अशोक सोसायटी कुमठा नाका येथील 68 वर्षांचे पुरुष. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,643 असून एकूण मृतांची संख्या 628 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 316 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10699 इतकी आहे.


हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *