शहर | व्यापाऱ्यांसाठी होणार अनलॉक ? -अजित पवारांनी घातलं लक्ष

BIG 9 NEWS NETWORK

ग्रामीण भागाच्या मानाने शहरातील कमी होणारा कोरोना संसर्ग, व्यापाऱ्यांचा वाढता दबाव, अर्थचक्रात अडकलेली शहराची परिस्थिती, व्यापारी संघटनांची पत्रकबाजी, आणि सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी घेतलेला पुढाकार यामुळे सोलापूर शहर व्यापाऱ्यांसाठी अनलॉक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सोलापूर शहर सर्व व्यापारासाठी अनलाॅक करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमदार संजय शिंदे व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवारांनी फोन पे चर्चा केली.
.यावेळी संतोष पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूरची सविस्तर माहिती दिली. कोरोनाची आजची शहरातील स्थिती,10 % च्या आत असणारा पाॅझिटिव्हीटी रेट याबाबत फोन करून माहिती दिली.

व्यापारासाठी सर्व नियम व निर्बंध लावून परवानगी द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री पवारांना केली. यावेळी अजित पवार यांनी व्यापार खुले करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगितले.

अनलॉक करण्यासाठी करणार सूचना

उपमुख्यमंत्री अजित दादांना शहरातील कमी होणारा कोरोना संसर्ग, ऑक्सीजन बेडची असलेली उपलब्धता, 10 % च्या आत Positive रेट बाबत बोललो आहोत.त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंत्रालयात गेल्यावर संबंधित अधिकारी यांना सोलापूर शहर व्यापारासाठी अनलाॅक करण्यासंदर्भात सूचना करतो असे सांगितले . यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल
संतोष पवार
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी पक्ष