BIG 9 NEWS NETWORK
मागील काही दिवसांपासून खाजगी शाळांचे आंदोलन लॉकडाउन विविध कारणांमुळे आरटीई प्रवेश आला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रवेशाची मुदत संपूनही अद्यापपर्यंत पन्नास ते साठ टक्के प्रवेश झाले आहेत.
त्यातील जवळपास 20 ते 30 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहे. यामुळे आरटीई प्रवेशासाठी 23 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियमानुसार खाजगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रशासनाकडून 9 जुलैपर्यंत मुदत आली होती; पण शहरातील साडेतीनशे पैकी एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नव्हते. तसेच जिल्ह्यातूनही आरटीई प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. दरम्यानच खासगी शाळांनी अनुदान मिळाल्याने प्रवेश न देण्याची भूमिका घेतली होती ; पण शिक्षणाधिकारी यांच्या मध्यस्थीने तिढा सुटला. पण धोरणामुळे अनेक ठिकाणी प्रवेश आला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे 23 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Leave a Reply