Big9news Network
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे लोककल्याणकारी राजा होते. म्हणून आज चारशे वर्षांनंतरही त्यांना जगात पूजनीय मानले जाते. छत्रपतींना कोणत्याही जाती, धर्म, पंथ अशा जोखडात मध्ये न अडकवता मानवतावादी , लोककल्याणकारी राजा म्हणून पाहिलं गेलं पाहिजे असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक मुसाखान लिखित शिवछत्रपतींची धर्मनिरपेक्षता या पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी आयोजित कार्यक्रमात खेडेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिंती संस्थानच्या सविताराजे भोसले, शहर काझी मुफती अहमद काझी, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव तनपुरे , विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, प्रदेश संघटक कर्नाटक राज्य ज्योतीराम पवार ,ज्येष्ठ विचारवंत सैफन अन्नवर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शिव फुले-शाहू-आंबेडकर विचार मुस्लिम मंचचे अध्यक्ष के.बी. नदाफ उपस्थित होते.
यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे येऊ दिला नाही, त्यामध्ये काही इतिहासकारांनी स्वतःची मते घालुन तो विकृत करण्याचा प्रयत्न केला. या विकृतीला फाटा देणारे पुस्तक मुसा खान यांनी लिहून छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता समाजासमोर आणली आहे.
यावेळी युरोप खंडातील सर्वोच्च माऊंट एलब्रुस शिखर सर केलेला विश्वविक्रम विर कुशाग्र हर्षद वाघज आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांचा सत्कारही खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
लेखक मुसाखान यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील एकोप्याचे दर्शन घडवणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अधारीत कविता सादर केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शहर काजी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची संख्या ही 35 ते 40 टक्के पर्यंत होती, अगदी विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी मुस्लिम सैनिकांची नेमणूक केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीच्या वेळी छत्रपती वर वार करणारा गैरमुस्लिम होता, तर महाराजावर झालेला वार झेलणारा हा मुस्लिम सैनिक होता. हिंदू राजाकडून मुस्लिम लढत होते तर मुस्लिम बादशहा कडून हिंदू लढत होते या लढाया जातीधर्माच्या नावावर नव्हत्या तर प्रतिष्ठेच्या होत्या. राजसत्तेसाठी लाढया होत्या मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी असल्याचे सांगत बदनाम केले जातअसल्याचेही मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुसाखान गौरव समिती चे निमंत्रक राम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास अजूनही जनतेपर्यंत येत नाही खरा इतिहास प्रत्येकानी सर्वसामान्यांच्या झोपडीमध्ये आणि उच्च ज्ञानी लोकानी खोपडी ठेवात तळागळा पोहोचवण्याचे काम केले पाहिजे .यासाठी प्रत्येकाने तोंडाचा उपयोग आकाशवाणी सारखा तरा डोळ्याचा वापर दूरदर्शन सारखा केला पाहिजे. असे मत पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले यावेळी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी मुसाखान गौरव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बाबर यांनी बांधलेली मशीद बाबरी मशीदच्या नावाने प्रसिद्ध झाली. यावरुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत पाडण्यात आली, मात्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याकुब बाबा यांना मशीद बांधण्यासाठी 653 एकर जागा दान केली त्या ठिकाणी मशिदीचे बांधली बाबरी मशिदवरुन भांडण लावणाऱ्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. छत्रपतींनी बांधलेल्या मशिदीला जास्त महत्त्व द्यावे असे मत शहर काझी यांनी यावेळी व्यक्त केले.