Big9news Network
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने इंग्रजी नविन वर्षाच्या New Year 2022 )आरंभ निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे.
विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विविध सण, समारंभ, राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. अनेक भाविक त्यासाठी आधी मंदिर समितीशी संपर्क साधून आवश्यक ती फुले आणि फळे उपलब्ध करून देत असतात.
इंग्रजी नवीन वर्षारंभाच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात विविध रंगांची तब्बल 1500 किलो फुले आणि 700 किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली आहे. फुलांची आरास करण्यासाठी आळंदी येथील भाविक प्रदीप प्रकाश ठाकूर पाटील यांनी फुले उपलब्ध करून दिली आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लाखो वारकर्यांची विठूमाऊलीच्या या मंदिरात, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभार्यात नयनरम्य अशा फळांची आणि फुलांची आरास करण्यात आल्याने अतिशय प्रसन्न वातावरण निर्मिती झाली आहे. नूतन वर्षाच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने आकर्षक फळाफुलांची भेट विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
यासाठी गुलाब, जरबेरा, ब्लू डीजे, कामिनी, शेवंती, ऑर्केड, मिनीपाम, सॅंगोप, ड्रेसीना सायकस या वेगवेगळ्या फुलांचा वापर करण्यात आलाय. यामुळे डोळ्यांचे पारणे फिटले अशी प्रतिक्रिया दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.