ग्रामीण | आज बरे झाले 642; तर नवे बाधित रुग्ण 362

Big9news Network

आज दि.11 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 362 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज शुक्रवारी 11 जून रोजी ग्रामीण भागातील 362 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 228 पुरुष तर 134 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 642 आहे. यामध्ये 345 पुरुष तर 297 महिलांचा समावेश होतो. आज 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9,642 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 9,280 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.