Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर शहरात लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यावर लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश आले आहेत. कोविड-१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे शहरामध्ये प्रभावी अमंलबजावणी होणकामी शहरातील पेट्रोल पंप, रिक्षा, प्रवाशी वाहतूक, मोठे मॉल्स, बँका, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिडी कारखाने व सर्व आस्थापने इ. गर्दीचे ठिकाणी लसीकरणाचे २ मात्रा घेतलेबाबत नागरिकांची तपासणी करून लस घेणेबाबत लोकांमध्ये जनजागृती करून प्रवृत्त करणे, प्रसंगी नियमानुसार दंडात्मक कारवाई करावे असे आदेश आले आहेत. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन व महानगरपालिका यांनी समन्वय साधून शहरातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होण्यासाठी नागरीकांना जागृत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

बैठकीत झालेल्या आदेशाप्रमाणे मनपा विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रानुसार अधिकारी, डॉक्टर, पोलिस निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांचे पथक तयार करण्यात आले असून, सदर पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय अधिकारी हे काम पाहणार आहेत. विभागीय अधिकारी यांनी पथकातील सर्व सदस्यांचा समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांची दैनंदिन जास्तीत जास्त तपासणी करण्याबाबत नियोजन करून तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोविड प्रतिबंध अनुरुन वर्तन विषयक नियम व दंड याबाबत संदर्भ क्र.१ अन्वये पारीत केलेल्या निर्देशानुसार ज्या आस्थापनामध्ये हॅन्ड सॅनिटायझर, साबन, पाणी, तापमापक इत्यादी बाबी उपलब्ध नसतील अशा आस्थापनांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

  • हे आहेत नियम –
  1. कोवीड प्रतिबंधक वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी र.रु५००/- दंड करणे.
  2. ज्या आस्थापनेत ग्राहक, अभ्यागत यांचेकडून कोविड प्रतिबंधक वर्तनाचे पालन होणार नाही. त्या ग्राहक, अभ्यागत यांचेवर दंड लावण्या व्यक्तीरीक्त संबंधीत आस्थापना, संस्था यांना सुध्दा र.रु.१०,०००/- इतका दंड करण्यात येईल. एखादया संस्थेत आस्थापनेत कोविड प्रतिबंधक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यास सदर संस्था, आस्थापना कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल.
  3. एखादया संस्थेकडून किंवा आस्थापनेकडून कोविड प्रतिबंधक वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीच (SOP) पालन करण्यात कसून केली जात असेल तर ती संस्था आस्थापना प्रत्येक प्रसंगी र.रु.५०,०००/- इतक्या दंडास प्रात्र असेल त्याचप्रमाणे वारंवार कसून केल्यास कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल.
  4. कोणत्याही खाजगी वाहतूक करणान्या बस, चार चाकी वाहनात कोविड प्रतिबंधक वर्तनात कसून केल्याचे आढळण्यास वर्तनात कसून करणाऱ्या व्यक्तीस र.रु.५००/ व सेवा पुरविणारे वाहन चालक / बाहक यांना सुध्दा रु.५००/- इतका दंड करण्यात यावा. बस मालक यांचे बाबतीत र.रु.१०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसून झाल्यास कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक-एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचा परीचालन बंद करण्यात येईल.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा आस्थापना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनिमय यानुसार कारवाई करण्यात येणार आहेत. अशा व्यक्ती, संस्था अथवा आस्थापना यांच्या विरुध्द संबंधीत पथकाने कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले आहेत.

सोबत –                                                                    विभागीय कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या अधिकारी, डॉक्टर, लसीकरण केंद्र इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *