Big9news Network
महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपच्या वतीने रविवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५ यावेळेत होटगी राेड, आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालयात २७ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील (बुलढाणा) यांनी केली.
मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवाजी प्रशालेत रविवारी बैठक पार पडली. व्यासपीठावर संयोजक शालिवाहन माने देशमुख, संजय पौळ, निर्मला शेळवाने, सोमनाथ किल्लेदार, अरुणा पवार आदी उपस्थित होते. यावेळी बुलढाणा येथून आलेले जवंजाळ पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच मेळाव्याची रुपरेषा तसेच नियोजन आणि जबाबदारी याबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी मेळाव्याची 12 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली.
यावेळी मेळाव्याची जबाबदारी स्वीकारणारे माने देशमुख, पौळ, किल्लेदार, शेळवणे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस किसनराव उबाळे, अॅड. सुधाकर वळेकर, सागर कदम, शोभना सागर, मनीष नलावडे, विमल माने, सुवर्णा शिवपुरे, मधुमती कट्टे, सविता कणसे, जयश्री साठे,सीमा शेळवणे, कविता जाधव, अभिषेक पवार, मधुकर लोंढे, अरविंद गायकवाड, दिनेश जाधव, विशाल भांगे आदी उपस्थित होते.
मेळावा मोफत, समाज
बांधवांनी सहभागी व्हावे
मराठा समाजातील युवक युवतींचे मोफत विवाह जुळवण्याचे काम महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून निशुल्क केले जाते. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात ग्रुप कार्यरत आहे. सोशल माध्यमातून मुला मुलींच्या बायोडाटाचे अदान प्रदान करुन हजारो विवाह जुळवण्यात आले आहेत. राज्यभरात मोफत वधुवर मेळावे आयोजित करून मराठा समाजातील पालकांना आधार देत त्यांचे संघटन करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील समाजबांधवांनी या वधू वर मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जवंजाळ पाटील यांनी केले.
Leave a Reply