Big9news Network
वधू-वर परिचय मेळावे आयोजित करणे काळाची गरज बनली आहे. यानिमित्ताने पालकांना आधार मिळतो, तसेच समाजाला जोडण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन मराठा सोयरिक चे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील यांनी केले.
महाराष्ट्र मराठा सोयरिक ग्रुपच्या वतीने रविवारी होटगी रोडवरील किल्लेदार मंगल कार्यालयात २७ व्या राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जवंजाळ पाटील बोलत होते. व्यासपीठावर पुष्पा जवंजाळ, सोमनाथ किल्लेदार, शालिवाहन माने देशमुख , संजय पौळ, किसनराव उबाळे, सागर कदम, रमेश आसबे , दत्ता मुळे, गजानन सुसार , राजेंद्र कोरके पाटील , शहाजी गोगांणे तसेच निर्मला शेलवणे , शोभना सागर , सुवर्णा शिवपुरे, मनिषा नलावडे , अरुणा पवार , सविता कणसे , सुनंदा साळुंखे , अर्चना साळुंखे , लता फुटाणे, लता ढेरे, विद्या शिंदे आदी उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात सोलापूर सह राज्यभरातील सुमारे आठशे वधू-वरानी नाव नोंदणी केली. तसेच पालकांसह एक हजार जणांनी सहभाग घेतला. यावेळी नाव नोंदणी करण्यासाठी गर्दी होती. मेळाव्यासाठी आलेले वधू-वर आणि पालकांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले, आभार निर्मला शेळवणे यांनी मानले.
हुंडा नको ची अपेक्षा…
दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात नाव नोंदणीनंतर वधू-वरांनी आपला बायोडाटा सांगत परिचय करून दिला. बहुतांश मुले आणि त्यांच्या पालकांनी हुंडा नको, चांगली मुलगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर मुलीकडून परिचय देताना सरकारी नोकरी, शेती आदी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. नावनोंदणी साठी मुलांची संख्या अधिक होती.
Leave a Reply