Big9news Network
विमानसेवा चालू करण्यासंदर्भात समाज कल्याण केंद्र, रंगभवन येथे शनिवारी सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित केली होती. पण ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावरून सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन, मिलिंद भोसले, आनंद पाटील यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
सहायक फौजदार दत्तात्रय देवमाने यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. सोलापूरचा विकास गोठवणाऱ्यांचा निषेध असो अशी घोषणाबाजी करत कोरोना नियम मोडल्याचे सांगत तक्रार देण्यात आली आहे.