Big9news Network
उजनी ते सोलापूर जलवाहिनी बुधवारी रात्री सापटणे (ता. माढा) जवळ रात्री ८ च्या सुमाराला अचानक फुटली. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
सापटणेजवळ पाण्याचे फवारे उडत होते. पालिकेच्या यंत्रणेला ही माहिती कळताच उजनी पंपगृह बंद करण्यात आले. दुरुस्तीसाठी पालिकेचे कर्मचारी रवाना झाले. दुरुस्तीचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पाकणी पंपगृहाला पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहील. तरी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी केले आहे.