सोलापूर — सोलापूर शहरांमध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता शहरांमध्ये हॉस्पिटल उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे पेशंट वाढत असून अजून कोविड केअर सेंटर उपलब्ध करण्यात यावे यासाठी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासमवेत सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, गटनेते रियाज खरादी, आयुक्त पि.शिवशंकर,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,नगर अभियंता संदीप कारंजे, नगरसेवक नागेश भोगडे,वैद्यकीय अधिकारी मंजरी कुलकर्णी आदी सह आज सिद्धेश्वर साखर कारखाना येथील काडादी मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले. त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करण्यात येईल त्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली.
याठिकाणी 140 बेडचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात येणार असून तसे नियोजन सुरू आहे .त्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासमवेत महापालिकेत सर्व पदाधिकारी,आयुक्त यांनी जुळे सोलापूर येथील म्हाडा कॉरटाईन सेंटर येथे भेट दिली तसेच त्या ठिकाणी कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल माहिती घेतली. नई जिंदगी येथील नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नागरिक आरोग्य केंद्राची पाहणी सुद्धा यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी कोरोना संदर्भातील विविध उपाययोजना महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहेत अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.