काळजी घ्या | मृत्यूदर थांबेना; आज ग्रामीण भागात तब्बल 18 जणांचा मृत्यू

Big9news Network

आज दि.20 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1091 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज मंगळवारी 20 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1091 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 630 पुरुष तर 461 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 629 आहे. यामध्ये 391 पुरुष तर 238 महिलांचा समावेश होतो. आज 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 8894 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7803 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.