Big9news Network
महेश हणमे /9890440480
यंदाही कोरोना विषाणूची येणाऱ्या संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शमी वृक्षाजवळ रूढी परंपरेप्रमाणे होणारे सीमोल्लंघन यंदा होणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी mh13 न्यूज शी बोलताना दिली.
सोलापुरातून तसेच राज्यभरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमे निमित्त अनेक भाविक तुळजापूर येथे पायी जात असतात .त्यांनाही यंदा परवानगी नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
परंतु शहरांमध्ये हुतात्मा चौक येथील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालून वंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने सीमोल्लंघनासाठी भाविक येत असतात. त्याबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नव्हता.
आज गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी थोड्याच वेळात आदेश निघणार असून याची माहिती पोलीस प्रशासनाला आणि प्रसार माध्यमांना देण्यात येईल असे विशेष प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शहर परिसरातील कोरोना विषाणूचा संसर्ग जवळपास संपल्यात जमा आहे. लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रुग्ण संख्या कमी झालेली आहे .या पार्श्वभूमीवर यंदा सीमोल्लंघनला परवानगी मिळेल अशी चर्चा शहरवासीयांमध्ये आणि सामाजिक संघटनामध्ये होती..पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.