Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

जिल्हा परिषद सोलापूर कोविड -19 कंट्रोल रूम तयार केली असून कोरोना रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सोलापूर ग्रामीण भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून चिंताजनक बाब म्हणजे मृत्यूचा दर धक्कादायक ठरत आहे. या सर्व संकटावर मात करण्यासाठी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य सुविधांची माहिती होणे गरजेचे आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेने कोविड रुग्णांच्या सुविधेसाठी कंट्रोल रूमची स्थापना केली असून कंट्रोल रूमचे क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
02172728398
02172728399
02172726538
02172726578
वरील क्रमांकावर संपर्क करुन नागरिक रुग्णालयातील बेड उपलब्धते बाबत माहिती जाणून घेऊ शकतात. तसेच रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्धता, ऑक्सिजन बेड उपलब्धते बाबत सुध्दा मार्गदर्शन या कंट्रोल रूम मध्ये मिळेल.

तरी नागरिकांनी वरील सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य‌‌‌ कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *