वाढदिवस म्हटलं की एक जल्लोष असतो यावेळेस मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु सामाजिक भान जपत त्या खर्चाचा विनियोग गोरगरीब गरजूंसाठी करून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. असाच एक स्तुत्य उपक्रम बाळे भागातील ढेपे कुटुंबाने राबवला आहे.
बाळे येथील सोनाई डेअरीचे मालक दिग्विजय ढेपे यांनी मुलीच्या पहील्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान करण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला.
दिग्विजय ढेपे यांनी आपली मुलगी नारायणी हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता राॅबीन हुड आर्मी सोलापूरच्या दररोज अन्नदान उपक्रमामध्ये योगदान दिले त्यामुळे काही गरजूंच्या मुखी अन्न मिळाले आहे.
हे तर माझे कर्तव्यच…
एकंदरीत कोरोनाचे असणारे संकट व अन्नदानाची असणारी गरज लक्षात घेऊन ह्या शुभप्रसंगी अन्नदान करुन गरजूंच्या वेदनेचा पुसण्याचा साक्षीदार होत असल्याचा आनंद वाटतो.
दिग्विजय ढेपे
नारायणीचे पिता