BIG 9 News Network
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे 26 जुलै रोजी सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यावर ठिय्या मांडला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच सर्व गटनेते, सदस्य व महिला सदस्य उपस्थित होते. यावेळी ऑनलाइन सभेच्या वेळी येणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या .परंतु, सुरू केलेले आंदोलन जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी केलेल्या खुलाशानंतर संपले.