Big9news Network
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा योजनेंतर्गत तसेच भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 22 मध्ये तब्बल अडीच कोटींच्या रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी नागरीकांच्या मुलभूत सुविधांच्या विकासकामांचा शुभारंभ *प्रभाग 22 चे कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा मनपा गटनेते किसन भाऊ जाधव व नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून उद्घाटन सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते धोंडीबा वस्ती रामवाडी यूपीसी सेंटरचे बाजूला करण्यात आले व त्यानंतर नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.
या सुनियोजित कार्यक्रमाला मनपा आयुक्त पी.शिवशंकर, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक थेंगळे पाटील, रामवाडी यूपीसी सेंटरच्या डॉ.स्वरांजली पवार डॉ.मंजिरी कुलकर्णी यांचे समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार, ज्येष्ठ नेते व माजी महापौर महेश अण्णा कोठे, नगरसेवक तौफिक शेख,गटनेते आनंद चंदनशिवे,नगरसेविका सुवर्णा वहिनी जाधव, नगरसेविका पूनम बनसोडे,नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक मनोज शेजवाल, नगरसेविका सुनिता रोटे, यांच्यासोबत मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, महेश गादेकर प्रशांत बाबर, सुहास कदम, मिलिंद गोरे, गफुर शेख, शंकर पाटील, शोभा गायकवाड,जय साळुंके आदी मान्यवर तसेच राष्ट्रवादीच्या विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने व प्रभागातील अंबादास गायकवाड, गणेश जाधव, सिकंदर शेख, राजू जाधव, कैलास हटकर, सागर कांबळे, शंकर लोखंडे, गोपाळ दोडमनी, सिद्धू गायकवाड, अल्लाबक्ष सय्यद शेख, गोपाल जाधव, श्रीकांत साहेब गायकवाड, अमोल लकडे, दत्ता होस्मनी, शिवप्पा शिकलवाडी, अर्जुन लोखंडे, पांडू दोडमनी, फिरोज पठाण,उत्तम कदम, शंकर बळ्ळारी, पिंटू जाधव, श्याम जाधव, उत्तम देडे,आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक मध्ये संबोधताना गटनेते किसन जाधव यांनी मागील 2 वर्षाच्या कोरोना कालखंडा मध्ये माझ्या ही कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असता अडचणी बाजूला ठेवून घरात न बसता कोरोना काळात प्रभागांमध्ये रुग्ण आढळल्यास त्यां रुग्णाची व कुटुंबातील सदस्यांची कॉरनटाईन करण्याची व्यवस्था सॅनिटायझर फवारणी कोरोना काळात नागरिकांना रक्तपुरवठा कमी पडू नये यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले व प्रभागातील नागरिकांसाठी दहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले व 2017 साली सदस्य म्हणून निवडून आल्यापासून प्रभागातील वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामे करण्यात आली व चालू वर्षांमध्ये प्रभागांमध्ये विकास कामासाठी पालकमंत्री यांना निधीची मागणी करण्यात आली असे प्रास्ताविका मधे मनोगत व्यक्त केले.
आयोजकांतर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे कर्तव्यदक्ष नगरसेवक किसन भाऊ जाधव नागेश अण्णा गायकवाड यांच्या कामाचे विशेष कौतुक करत जनतेच्या उपयोगी पडणाऱ्या सर्व विविध विकास कामांसाठी यापुढे देखील निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत लोकांनी दाखवलेला विश्वास पात्र ठरविण्यासाठी मी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सदैव तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी रामवाडी UPC. सेंटर येथील कोरोना काळात जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र झटलेल्या रामवाडी UPC सेंटर आशा वर्कर, रुग्ण सेविका तसेच स्वच्छता दूत यांच्या सत्काराचा कार्यक्रम त्यांना भेटवस्तू देऊन पार पडला.सदर कार्यक्रमास प्रभागातील बहुसंख्य महिला माता भगिणी उपस्थित होत्या. त्या सर्वांना आयोजकांतर्फे पालक मंत्री भरणे मामा यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. प्रास्ताविक गटनेते किसन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन नागेश अण्णा गायकवाड यांनी केले.