Big9News Network
कंगना ने भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झालाय. कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी व पद्मश्री पुरस्कार परत करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली.
पद्मश्री पुरस्कार मिळालेली वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने देशद्रोही विधान करून भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे कोणी सांगितले तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन असे स्पष्टीकरण दिले होते. याबाबत भारतीय स्वतंत्र बाबत कंगनाला किती अज्ञान आहे हे दिसून येते. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अभ्यास व्हावा तिच्या ज्ञानामध्ये सुधारणा व्हावी म्हणुन तीला पोस्टाने रजिस्टर करून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व लढा अशी पुस्तके घरी पाठविण्यात आली.
कंगना ने भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी व पद्मश्री पुरस्कार परत करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर संपर्कप्रमुख दत्ता जाधव संघटक महेश हिरेमठ सिद्धाराम सुतार आली नायकोडी इब्राहिम शेख इलियास शेख ईत्यादी उपस्थित होते.