Big9news Network
व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सोलापुरातील रिक्षा चालकावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम अब्दुलरजाक शेख ऊर्फ कुमठे (वय ४४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी बंदोबस्त लावण्यात आला होता. गोपनीय शाखेकडील पोलीस कॉन्स्टेबल अजितसिंह देशमुख, पोलीस नाईक बाळू जाधव, प्रभाकर देढे, पोलीस कॉन्स्टेबल सागर मुटकुळे हे गोपनीय पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, त्यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सलीम शेख ऊर्फ कुमठे याने त्याच्या मोबाइलमधून व्हिडिओ प्रसारित केला आहे.
माहिती मिळताच त्याच्या घरी जाऊन चौकशी केली व त्याला पोलीस ठाण्यात आणले. सलीम शेख याचा मोबाइल पाहिला असता त्यामध्ये एका युवकाला जमाव मारहाण करीत होता. हा व्हिडिओ कोणाकडून आला असे विचारले असता त्याने तो त्याच्या १५ वर्षांच्या मुलाने पाठविल्याचे सांगितले. हा व्हिडिओ कोणाकोणाला पाठविला असे विचारले असता त्याने तीन व्यक्तींना फॉर्वर्ड केल्याचे सांगितले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शब्बीर महिबूब तांबोळी (नेमणूक सदर बझार पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. सलीम शेख ऊर्फ कुमठे याच्यावर भादंवि कलम १५३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply