धक्कादायक| काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन ; कोरोनाशी लढा ठरला अयशस्वी

Big9news Network

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचा कोरोनाशी लढा अयशस्वी ठरला.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीत शुक्रवारी रात्री अचानक खालावली. डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाबाधित झाल्याने सातव जहांगीर रूग्णालयात दाखल होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात देखील केली होती. मात्र सातव यांना ‘सायटोमेगँलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.