Big9 news Network
राज्यात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत.उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसचे वाढते प्रमाण चिंता निर्माण करत आहेे या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.
म्युकरमायकोसीसमुळे डोळ्यांवर परिणाम झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळ्यावर बुरशी येते. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कमी झालेल्या रोग प्रतिकारक शक्तीमुळे म्युकरमायकोसीसचे प्रमाण वाढत आहे.
कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर अशा प्रकारच्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतात .कारण, या जंतूंचा प्रथम नाकातून शिरकाव होतो. नाकाशी जोडलेल्या हवेच्या पोकळ्या (सायनस )मध्ये जातात. सायनस हे डोळ्यांशी जोडलेले असल्याने तिथेही त्यांचा संसर्ग पोहचू शकतो.