आज ग्रामीण भागात 17 जणांचा मृत्यू; तर नवे कोरोना बाधित…

Big9news Network

आज दि.17 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1137 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज शनिवारी 17 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1137 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 696 पुरुष तर 441 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 522 आहे. यामध्ये 359 पुरुष तर 163 महिलांचा समावेश होतो. आज 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9337 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8200 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.