Big9news Network
कोरोना रोखण्यासाठी नवे सुधारित आदेश काढण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी कोविड १९ चे विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात ब्रेक द चेन सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे.
सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी प्राप्त निर्देशानुसार सुधारीत आदेश दि. १५/०८/२०२१ रोजी पासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार आहेत.
शॉपिंग मॉल्स :
अ) शहरातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस सकाळी ७.०० वा. पासून रात्री १० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरीकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
ब) वय वर्षे १८ खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने वय वर्षे १८ खालील वयोगटातील मुला/मुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा मलाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरुध्द अथवा व्यक्तिविरुध्द कार्यवाही करणेकामी संबंधित कार्यक्षेत्रातील सहाय्यक आयुक्त, विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक व त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी यांना राहतील.
Leave a Reply