Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

स्वामी समर्थांचे आशीर्वाद, स्वामी समर्थांची दिव्यदृष्टी, नेहमीच आपल्या पाठीशी राहावी याकरिता स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता येथे आलो असून स्वामींचे आशिर्वादच महाराष्ट्र केसरी विजेतेपदाचे पाठबळ असल्याचे मनोगत  यंदाचे महाराष्ट्र केसरी विजेते हर्षद सदगीर यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.

यावेळी सदगीर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, अमर पाटील, महादेव जानकर, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, वस्ताद अर्जुन पवार, साईनाथ गिडगे, प्रशिक्षक धनराज भुजबळ इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *