Big9news Network
हर्रर्र बोला… हर्रर्र….. श्री सिद्धेश्वर महाराज की जय… या जयघोषात सकाळच्या थंड आणि प्रसन्न वातावरणात श्री शिवशिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने प्रथमच 68 लिंग दर्शन यात्रा काढण्यात आली.
पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंग दर्शनाचे पुण्य लाभावे या हेतूने आणि त्याचप्रमाणे अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर कार्याची सुरुवात एखाद्या धार्मिक उपक्रमाने व्हावी याहेतूने 68 लिंग दर्शन उपक्रम आयोजित केल्याची माहिती नुतन अध्यक्षा स्मिता नाईक यांनी दिली.
या यात्रेची सुरुवात शुक्रवारी सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे श्री सिद्धेश्वर यांची आरती करून करण्यात आली. महिलांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचे संकट दूर करण्याची प्रार्थना श्री सिद्धरामेश्वरांकडे केली. यात्रेदरम्यान महिलांनी प्रत्येक लिंगाला अभिषेक करून मनोभावे पूजा केली. लिंगाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याचे आणि 68 लिंग दर्शन करण्याची अनेक वर्षांची ईच्छा पूर्ण झाल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर दिसून आले. सांयकाळी यात्रेचा समारोप श्री मल्लिकार्जुन मंदिरात आरती करून करण्यात आला. यानंतर महिलांनी मंदिरात प्रसाद घेतला.
या यात्रेत सचिवा पौर्णिमा तोटद, पुष्पा छपरे, लता नरोणे, निर्मला याळगी, पुष्पा विजापुरे, नेत्रा मोगले, शोभा शिवणगी, ज्योती बोरामणी, निर्मला बुऱ्हाणपुरे, सुनीता कल्याणशेट्टी, नैना येळदरी, संयुक्ता दुधनी, जयलक्ष्मी कालदिप, शोभा जत्ती, श्वेता शिवणगी, सोनाली विजापुरे, नमिता चोळळे, सुजाता बुऱ्हाणपुरे आदी महिला सहभागी झाल्या होत्या..
श्री शिवशिंपी समाज महिला मंडळाच्या 68 लिंग दर्शन यात्रेप्रसंगी नुतन अध्यक्षा स्मिता नाईक, पुष्पा छपरे, लता नरोणे, निर्मला याळगी, पुष्पा विजापुरे, पौर्णिमा तोटद, नेत्रा मोगले, शोभा शिवणगी, ज्योती बोरामणी,
Leave a Reply