Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

सोलापूर – जाधव घर ते शिक्षक सोसायटी वसंत विहार भाग 3 येथील माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या फंडांतुन ६४ लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याच्या डांबरीकरनाचे उद्घाटन प्रभाग ५ अ च्या नगरसेविका स्वातीताई आवळे व शिवसेना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

बाळे भागासाठी आ.विजयकुमार देशमुख यांनी दोन कोटी निधी दिलेला आहे. विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम आ.विजयकुमार देशमुख यांनी केले व यापुढेही करतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकिमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निवडून द्यावे आणि आपल्या भागातील विकास करून घ्यावा असे मत सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी व्यक्त केले.

आ.विजयकुमार देशमुख यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. आपल्याभतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होत असल्याने नागरिकांच्या समस्या सुटणार आहेत गायत्री नगर भागातील नागरिक आ.विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी कायम उभे राहतील असे मत शिवसेना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश जगताप यांनी व्यक्त केले.

शिवसेना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश जगताप यांनी पाठपुरावा केल्यानेच या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झालेले आहे. नगरसेविका स्वातीताई आवळे व समाधान आवळे यांनी देखील प्रभागातील समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असे मत राजाभाऊ आलूरे यांनी मांडले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, संदीप दुगानेझ पाणीपुरवठा विभागाचे राजेश काकडे, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, विशाल ढंगेकर, एसटी बँकेच्या संचालिका जयंतीताई भोसले, साळुंखे ताई, अंजली गुंड, रचना पाटील, प्रमोद गुंड, सुहास लोंढे, मंगेश क्षीरसागर, वैभव पाटील, एस.के कुलकर्णी, बाळासाहेब बेंडकाळे, दिलीप टेकले, पारप्पा पोळ, राहुल चंदेल, नागेश चंदेले, रोहित भोसले, गणेश अडलिंगे, बापू सरवळे दिनेश माने, भारत पाटील व या भागातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *