सोलापूर– सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री एन. के पाटील यांनी आज सोलापूर शहरातील विविध मंडई येथे भेट दिली. त्या मध्ये लक्ष्मी मंडई, कस्तुरबा मंडई, जोडबसवण्णा चौक येथील मंडई,,अशोक चौक येथील चिपा मार्केट या ठिकाणी भेट दिली.
तसेच यावेळी झोन क्रमांक 1,2 व 3 या ठिकाणीही त्यांनी भेटी दिली. यामध्ये मंडेई मध्ये भाजी विक्रेता यांनी यावेळी उपायुक्त यांच्यासमोर विविध अडचणी मांडल्या .
या आहेत अडचणी…
आम्हाला पाण्याची समस्या ,बैठक व्यवस्था तसेच साफसफाई इत्यादी या ठिकाणी होत नसल्याचे तक्रार विक्रेत्यांनी मांडली.
तातडीने दिल्या सूचना…
यावेळी उपायुक्त एन.के पाटील यांनी संबंधित विभागास तातडीने त्यांचे प्रश्न सोडवण्यात यावे अशा सूचना यावेळी केल्या. तसेच भाजी विक्रेत्यांनी थकबाकी भरण्याबाबत सुचना दिल्या .थकबाकी वेळ मध्येच भरुन महापालिकेस सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर पुढील कारवाई करण्यात येईल असे सूचनाही यावेळी उपायुक्त यांनी दिले.
Leave a Reply