सोलापूर दि.1/1/2022-
दि.31/12/2021 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक नागेश लिंगराज वल्याळ यांच्या संकल्पनातून प्रभाग क्र.9 मध्ये पूर्व विभागातील खवय्या नागरिकासांठी पूर्वविभाग चौपाटी साकारण्यात आले असून त्यांचे लोकार्पण कार्यक्रम शहराअध्यक्ष विक्रम देशमुख व आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
कर्णिक नगरकडे जाणारा रस्ता हा निर्मनुष्य व घाणीचा सम्राज्य असलेला रस्त्याच्या फुटपाटवर चौपाटीचा संकल्पना मा.आयुक्त यांच्याकडे सादर केले व मा.आयुक्त यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर याठिकाणी भांडवली निधी मधून हा रस्ता साफसफाई करुन येथे प्रथमता 16 कट्टा गाळे तयार करुन घेतले आहेत व त्यांचे लिलाव पध्दतीने गाळे देण्यात आले असून आज त्याचे लोकार्पण सोहळा होत आहे. असे मा.नगरसेवक नागेश वल्याळ यांनी प्रस्ताविकेत माहिती दिली.
नगरसेवक नागेश वल्याळ यांनी त्यांचा भाडवली निधी खर्चकरुन चौपाटीसाठी 16 कट्टा गाळे तयार केले असून हे गाळे लिलाव पध्दतीने देण्यात आले आहे.त्याचा फायदा मनपा उत्पनात वाढ होणार आहे. तसेच ज्या ज्या गाळेधारकांना हे गाळे मिळाले आहे त्यांनी स्वच्छताकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.असे मा.आयुक्त पि.शिवशंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच भाजपा शहरअध्यक्ष विक्रम देशमुख, काजळे ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेवक अविनाश बोमडयाल,भाजपा सरचिटणीस बिज्जूअण्णा प्रधाने,माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, माजी नगरसेविका इदिरा कुडक्याल, विजया वड्डेपली, तसेच गोपीअण्णा वड्डेपली, भिमाशंकर जावळे,सौ.रेखा फत्तेपूरकर, सिध्दार्थ मंजले, कमटम श्रीकृष्ण वैद्य आदीसह बहुसंख्य पुर्वविभागातील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply