Big 9 News Network
सोलापूर,दि.20 : कोरोनाच्या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात टाळेबंदी असून या काळात गरजू, गरीब नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारने मे आणि जून 2021 या दोन महिन्याचे गहू आणि तांदूळ मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. मात्र रेशन दुकानदारांविरूद्ध नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत, तक्रार निवारणासाठी सोलापूर शहरात अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
शहरात परिमंडळ अधिकारी, अ, ब, क, ड विभागाच्या अधिनस्त 314 रास्त भाव धान्य दुकानात मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. धान्य वाटप करताना दुकानदार मंजुरीपेक्षा कमी धान्य देत आहेत, पावती देत नाहीत, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर गहू, तांदूळ पावती देऊन मोफत द्यायचे आहे. शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेतल्यानंतर दुकानदाराला पावतीची मागणी करावी. मंजूर धान्य न दिल्यास किंवा पावती न दिल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन श्री. समिंदर यांनी केले आहे.
अ विभाग (सुरेश गायकवाड-9923701818, नितीन शिंदे-8329259966, सोनाली निठुरे-9022008681), ब विभाग (नितीन वाघ-9067229628, सुयोग देशमुख-8208901672, श्री. चंदनशिवे-9284589855), क विभाग (अनिल गवळी-9822293052, अनिल शहापुरे-7620999268, इलियास भाईकट्टी-9834927686), ड विभाग (सुरेश गायकवाड-9923701818, लक्ष्मण पवार-9665122071, मनीषा अंकुशे-8208828246)
Leave a Reply