BIG 9 NEWS NETWORK
सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यावर्षी गणेश उत्सव सुरळीत व शांती पूर्वक पार पडले त्याबद्दल महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी शहरवासीयांचे आभार मानले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करत पालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवावर काही निर्बंध घातले होते. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता गणेश उत्सव साजरा करण्याकरिता योग्य त्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या दहा दिवसाच्या गणेश उत्सवा नंतर अनंत चतुर्थीचे देखील विशेष असे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेश भक्ताकरिता वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी होती. अधिकाधिक गणेशभक्त रस्त्यावर येणार नाहीत याकरिता पालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागातील 100 संकलन केंद्र येथून सुमारे 83 हजार गणेश मूर्ती संकलन करण्यात आले होते. संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन तुळजापूर रोडवरील दोन खाणीत व नऊ विहिरीत आदरपूर्वक करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसह अधिकारी उपलब्ध करण्यात आले होते. त्या ठिकाणी कर्मचारी व अधिकारी हे रात्री 12 वाजेपर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेश विसर्जन झाल्यामुळे यापुढेही पुढच्या वर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी शाडूची गणेश मूर्ती किंवा मातीची गणेश मूर्ती स्थापन करून घरातच विसर्जन करावे. महापालिकेच्या आवाहनाला सोलापूर शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल व गणेश विसर्जनासाठी महापालिकेला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे अशा सर्वांचे आभार आज महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी मानले.