BIG 9 NEWS NETWORK
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह योजनेंतर्गत आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते दक्षिण तालुक्यात विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी सुरूवातीला होटगी स्टेशन येथील सोलापूर- औज इंगळगी या रस्त्याचे भूमिपूजन आ. देशमुखांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सिंदखेड आणि संजवाड येथे आ. देशमुख यांनी भेट देत कोरोना काळात कार्य केलेल्या कोविड योद्धा व आशा वर्कर यांचा सन्मान केला. दुपारी आ. देशमुख यांनी तालुक्यातील हत्तरसंग,टाकळी व नांदणी येथे भेट दिली व तेथील कोविड योद्धा यांचा सन्मान केला. त्यानंतर विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. या सर्व कार्यक्रमांना जि.प. सदस्य अण्णाराव बाराचारे, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, जगन्नाथ गायकवाड, भारत रुपनवर, निसार कांबळे, अंबिका पाटील, अतुल गायकवाड, आप्पासाहेब मोटे, बाप्पा भोसले, विजय खडसे, भगवान वावरे व ग्रामस्थ उपस्थित होते.