Day: May 8, 2021
-

जगदंब बियर शॉप वर कारवाई ; देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त
Big 9 News Network सोलापूर (प्रतिनिधी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील जगदंब बिअर शॉपीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.याप्रकरणी आरोपी मल्लिनाथ राम माने (वय-३०,रा.बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर याला अटक करण्यात आली असून,त्याच्याकडून ५३ देशी विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या असा मिळून एकूण सहा हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही…
-

२५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आदेश
Big 9 News Network अकोला येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना दिले आहेत. याकामी अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हाधिकारी यांची मदत घेण्यात यावी…
-

पंढरपुरात इलेक्शन ड्युटी : शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू
पंढरपुरात पोटनिवडणुकीनंतर कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या निवडणूक प्रक्रियेत सामील झालेल्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सांगोला तालुक्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील आई, वडील आणि मावशीचा मृत्यू झाला.पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. इथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची…
-

दूरध्वनीद्वारे संवाद : महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईविषयी प्रधानमंत्र्यांनी केले कौतुक
मुंबई, दि.८ : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या…
-

ऑक्सिजनचा सूक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या संशोधकाचाच अंतिमक्षणी ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू
Big 9 News Network ऑक्सिजनचा सूक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या संशोधकाचाच अखेरच्या क्षणी ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला . कोल्हापूरचे ज्येष्ठ संशोधक प्रा . डॉ . भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत कोरोनाने बळी घेतला . जीवघेण्या आजारात ऑक्सिजनची संजीवनी देऊन जीवदान देणाऱ्या हा दिग्गज संशोधक वयाच्या 44 व्या वर्षातच ऑक्सिजनच्या कमतरतेचा बळी ठरला , ही बाब तमाम कोल्हापूरकरांनाही…